भांडुपमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडुपमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालय
भांडुपमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालय

भांडुपमध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालय

sakal_logo
By

भांडुप, ता. ७ (बातमीदार) ः मुंबई महापालिका सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे भांडुप परिसरात मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या हस्ते पार पडले. स्थानिक नगरसेविका आशा कोपरकर यांनी रुग्णालय व्हावे यासाठी सतत चार वर्षे पाठपुरावा केला.
रुग्णालय ही नागरिकांची गरज असून हे रुग्णालय मध्‍यवर्ती ठिकाणी उभारण्यात येत असल्याने याचा फायदा जवळपासच्या नागरिकांना होऊ शकेल. भांडुप परिसरात असे रुग्णालय झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.
दहा मजली इमारतीच्या या रुग्णालयात ४०० बेडची सुविधा असेल. रुग्णालयात १४ शस्त्रक्रिया विभाग, अपघात विभाग, विलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग, प्रसूती कक्ष, बालकांसाठी अतिदक्षता विभाग, डायलेसिस आदी विविध सुविधा असणार असल्याचे कोपरकर यांनी सांगितले. या वेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, कार्याध्यक्ष मुंबई काँग्रेस चरणसिंग सप्रा, नगसेवक सुरेश कोपरकर, बिपीन विचारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top