मुंबईत कोरोनाचा एकही गभीर रुग्ण नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाचा एकही गभीर रुग्ण नाही
मुंबईत कोरोनाचा एकही गभीर रुग्ण नाही

मुंबईत कोरोनाचा एकही गभीर रुग्ण नाही

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने तिसरी लाट जवळपास शमल्याचे चित्र आहे. दररोजच्या नवीन रुग्णांची संख्या आता ४० च्या आत आली आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होत असतानाच गंभीर रुग्णांची संख्याही शून्यावर आली आहे. कोरोना साथ सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच रुग्णालयात कोरोनाची लागण झालेला एकही गंभीर रुग्ण नाही.
मुंबईला आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटांचा सामना करावा लागला आहे. पालिकेच्या डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार जेव्हा फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली, तेव्हा गंभीर रुग्णांची संख्या १७०० पेक्षा जास्त होती. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला म्हणजे डिसेंबरमध्येही गंभीर रुग्णांची संख्या १५०० हून अधिक होती; मात्र तिसरी लाट अगदीच कमी झाल्यानंतर सोमवारी गंभीर रुग्णांची संख्या शून्यावर आली.
विविध रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीत कोरोनाचे केवळ ११ रुग्ण दाखल आहेत. २९० सक्रिय रुग्णांपैकी २४६ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत; तर ४४ रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कोरोना रुग्णांसाठी राखीव असलेल्या व्हेंटिलेटरच्या ९४६ खाटांवर एकही रुग्ण नाही. याशिवाय आयसीयूच्या १,७२४ खाटांपैकी फक्त चार खाटांवर रुग्ण आहेत. यासोबतच ऑक्सिजनच्या पाच हजार ७७६ खाटांपैकी पाच हजार ७७४ खाटा रिक्त असून फक्त दोन रुग्ण आहेत.

पालिकेची रणनीती, लसीकरण आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करणारे नागरिक, यामुळे कोविड नियंत्रणात आला आहे. कोविडचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये. यासह लसीकरण करून घ्यावे. कारण त्यातून सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..