Collection of tax
Collection of tax sakal media

उल्हासनगर पालिकेच्या नगरविकास विभागाकडून ५६ कोटींची वसूली

उल्हासनगर : एकीकडे मालमत्ता कर विभागाने (Property tax department) ११० कोटींच्या वर वसुलीचा विक्रम (tax collection record) केला असतानाच आता पालिकेच्या नगररचना विभागाने देखील वसुलीत गरुडझेप घेतली आहे. या विभागाने १२९ बांधकाम परवान्यातून तब्बल ५६ कोटी रुपयांची वसुली (Fifty six crore collection) केली आहे. आजपर्यंतच्या वसुलीचा हा ऐतिहासिक उच्चांक असल्याचे सांगण्यात आले आहे. आयुक्त डॉ. राजा दयानिधी (Dr Raja Dayanidhi) यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी कमी मनुष्यबळात ही कामगिरी केली आहे.

Collection of tax
अलिबाग : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यतत्परतेमुळे महिलचे प्राण वाचले

गेल्या ५ वर्षांपासून नगररचनाकार संजीव करपे हे बेपत्ता आहेत. वादग्रस्त बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी अरुण गुरगुळे यांना अटक झाली होती. मनोज ताराणी हे लाच प्रकरणात अडकले होते. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत असलेल्या नगररचना विभागाचे काम खोळंबले होते. मात्र, १ जून २०२१ रोजी पदभार स्वीकारणारे नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी या विभागाला वादातून बाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे.

कनिष्ठ अभियंत्यांच्या जागा रिक्त आणि मनुष्यबळ कमी असतानाही आयुक्त डॉ. दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली मुळे यांनी बोटावर मोजण्या इतपत असणाऱ्या स्टाफला विश्वासात घेऊन बांधकाम परवाने देण्याची प्रक्रिया हाताळली आहे. जे १२९ परवाने दिले गेले आहेत, त्यात ६ ते १२ मजल्याच्या इमारतींसोबत एक २४ मजली टॉवरचा समावेश आहे. बांधकाम परवान्यातून ५० कोटी ८२ लाख रुपये आणि पाच कोटींचा कामगार उपकर आहे, अशी माहिती नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com