श्रमजीवीने घातला आरोग्य व्यवस्थेचा ‘तेरावा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रमजीवीने घातला आरोग्य व्यवस्थेचा ‘तेरावा’
श्रमजीवीने घातला आरोग्य व्यवस्थेचा ‘तेरावा’

श्रमजीवीने घातला आरोग्य व्यवस्थेचा ‘तेरावा’

sakal_logo
By

वाडा, ता. ७ (बातमीदार) ः वाडा ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने, तसेच रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उपचारासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. याविषयी वारंवार तक्रार करूनही आरोग्य प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य व्यवस्थेचे ‘तेरावे’ घालून आरोग्य प्रशासनाचा निषेध नोंदवला. सुमारे सात तास भर उन्हात हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष भरत जाधव, रफिक चौधरी, प्रमिला तरसे, रेखा पराड, किशोर मढवी यांनी केले.
वाडा ग्रामीण रुग्णालयाला गेल्या वर्षभरापूर्वी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. मात्र दर्जा मिळाला असला तरी पूर्वीसारखीच परिस्थिती येथे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधीक्षक हे गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर आहेत. त्यांच्या येथील शिकाऊ डॉक्टरच रुग्णालयाचा कारभार हाकत आहेत.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
वैद्यकीय अधीक्षक सुनील भडांगे हे शुक्रवारपासून (ता.८) रुग्णालयात हजर राहणार आहेत; तर आणखी एक डॉक्टर अजय देवघरे वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयात सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..