पाणी समस्या वर विशेष सभेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी समस्या वर विशेष सभेची मागणी
पाणी समस्या वर विशेष सभेची मागणी

पाणी समस्या वर विशेष सभेची मागणी

sakal_logo
By

पनवेल, ता. ७ (प्रतिनिधी) ः महापालिका हद्दीत निर्माण होणारी पाणीसमस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करावे, अशी मागणी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होत असते; मात्र शहरवासीयांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडे पाण्याचे अपुरे स्रोत असल्याने एमजेपी, एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकेच्या पाण्यावर शहराची तहान भागवावी लागते. पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या या प्राधिकरणांमार्फत अनेकदा पाणीकपात केली जात असल्याने पनवेल शहरात नेहमीच पाणीटंचाई निर्माण होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक म्हात्रे यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..