प्रियकरानेच गोवले प्रेयसीला खुन्याचा गुन्ह्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रियकरानेच गोवले प्रेयसीला खुन्याचा गुन्ह्यात
प्रियकरानेच गोवले प्रेयसीला खुन्याचा गुन्ह्यात

प्रियकरानेच गोवले प्रेयसीला खुन्याचा गुन्ह्यात

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ७ (बातमीदार) : प्रेयसीला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी एका व्यक्तीने निष्पाप तरुणाची हत्या केल्याची घटना घडली होती, या गुन्ह्याचा आठ दिवसांत छडा लावत अंबरनाथ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वामन शिंदे (वय ३९) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

फॉरेस्ट नाका परिसरात राहणाऱ्या वामन शिंदे याचे त्याच परिसरात राहणाऱ्या अनिता काठे हिच्याशी प्रेमसंबंध होते. वामन शिंदे एका गुन्ह्यात काही महिने नाशिक कारागृहात शिक्षा भोगत होता. या दरम्यान प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध निर्माण झाल्याच्या संशयावरून शिंदे याने तिला अद्दल घडवण्यासाठी जामिनावर बाहेर येताच कट रचला. प्रेयसीकडून तिचे मतदार ओळखपत्र घेऊन तिच्या नावे चिठ्ठी लिहून घेतली होती, ज्यात प्रेयसीचा मोबाईल क्रमांक होता. त्यानंतर ३१ मार्च २०२१ ला शिंदेने कल्याणमधून अमित नावाच्या मजुराला काम देण्याच्या बहाण्याने बदलापूरला आणले. तेथे अमितला गणपत ढाब्यासमोरील एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर नेऊन त्याची चाकूने गळा चिरून हत्या केली आणि त्याच्या खिशात प्रेयसीचे मतदार ओळखपत्र, चिठ्ठी ठेवून पळ काढला होता. १ एप्रिलला पोलिसांनी अमित यांच्या खिशात अनिताचे ओळखपत्र मिळाल्याने अनिता हिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर अनिताने मतदार ओळखपत्र शिंदे याने घेतल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी शिंदे याला ताब्यात घेतले. वामन शिंदे याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आल्याची माहिती अंबरनाथचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..