मनसेच्या उत्तरसभेचा मुहूर्त हुकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेच्या उत्तरसभेचा मुहूर्त हुकला
मनसेच्या उत्तरसभेचा मुहूर्त हुकला

मनसेच्या उत्तरसभेचा मुहूर्त हुकला

sakal_logo
By

ठाणे, ता. ७ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावर आपली भूमिका मांडल्यानंतर अनेक पक्षांमधून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी मनसेच्यावतीने ९ एप्रिलला ठाण्यात राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होतेय परंतु सभा स्थळाचा पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता १२ एप्रिलला चिंतामणी चौक ते दगडी शाळा या रस्त्यावर सभा होणार असल्याची माहिती मनसे नेते अभिजित पानसे, संदीप देशपांडे आणि आमदार राजू पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसकडून राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यावर मांडलेल्या भूमिकेवर टीका करण्यात आल्याने त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांच्या ९ एप्रिलला होणाऱ्या ठाण्यातील सभेत काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यासाठी गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळपी मुस चौकात राज ठाकरे यांची सभा घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. परंतु, अन्य कार्यक्रम आणि सणांमुळे येथे गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही सभा ९ एप्रिल न घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे सभा १२ एप्रिलला घेण्याचे आम्ही निश्चित केल्याचे मनसे नेते अभिजीत पाने यांनी सांगितले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले की, गजानन महाराज चौक रस्ता गुरुवारी दुपारी सभेसाठी अंतिम करण्यात आला. मात्र त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत पोलिसांकडून स्पष्टता झाली नाही. त्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जागांची चाचपणी केली. अखेर पोलिसांच्या विनंतीला मान देत सभा १२ एप्रिलला चिंतामणी चौक ते दगडी शाळा येथे घेण्याचे निश्चित केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..