बोईसरमध्ये तीन किलो गांजा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसरमध्ये तीन किलो गांजा जप्त
बोईसरमध्ये तीन किलो गांजा जप्त

बोईसरमध्ये तीन किलो गांजा जप्त

sakal_logo
By

मनोर, ता. ८ (बातमीदार) : बोईसर शहरातील एका इमारतीमध्ये शुक्रवारी पहाटे बोईसर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. दोन किलो ९०० ग्रॅम वजनाच्या गांजाच्या साठ्यासह एका तरुणाला अटक करण्यात आली. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बोईसर पोलिस ठाणे हद्दीत अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. धनानी नगर भागातील ड्रीम सिटी नामक इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कुटरच्या डिक्कीमध्ये गांजाचा साठा असल्याची माहिती एका व्यक्तीने पालघर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानुसार आज (ता. ८) पहाटे सव्वादोन वाजता बोईसर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. कारवाईत दोन किलो ९०० ग्रॅम गांजाच्या साठ्यासह गणेश स्वामी उर्फ अन्ना (वय ३१) याला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top