वालधुनी नदी किनारा होणार हिरवागार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वालधुनी नदी किनारा होणार हिरवागार
वालधुनी नदी किनारा होणार हिरवागार

वालधुनी नदी किनारा होणार हिरवागार

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) ः लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या वालधुनी नदीच्या संवर्धन आणि स्वच्छतेने वेग घेतला आहे. स्वच्छ आणि सुंदरतेकडे वाटचाल करणाऱ्या वालधुनी नदीकिनारी आता एक हजार १११ झाडे लावण्याचा संकल्प नगरपालिका प्रशासनाने केला आहे. याकामी नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी वैयक्तिक १०१ रोपे देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
अंबरनाथच्या हद्दीमध्ये उगम पावणाऱ्या वालधुनी नदीला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने नगरपालिकेच्या वतीने लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून १४ फेब्रुवारीपासून ५ जून २०२२ पर्यंत नदीपात्रासह नदीकिनारा स्वच्छ करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मातोश्री ट्रस्टने याकामी मोठा पुढाकार घेतला आहे. तसेच वालधुनी बिरादरीसारख्या असंख्य सेवाभावी संस्था, काकोळे ग्रामस्थ, पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नदी स्वच्छता मोहिमेत हिरिरीने भाग घेत आहेत. नदी संवर्धनात सुहासिनी अधिकारी शाळा आणि गोखले रहाळकर शाळेच्या विद्यार्थ्यांनीदेखील सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
नदी स्वच्छता मोहिमेचा अर्धा टप्पा पूर्ण झाला असून उर्वरित ४० ते ४५ दिवसांत उर्वरित कामे पूर्ण झाल्यावर नदीकिनारी एक हजार १११ मोठी रोपे लावण्याचा निर्धार मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती मिळताच अनेक व्यक्ती, संस्था यांनी लागणारी झाडे आणि रोपे देण्याची तयारी दर्शवली आहे.

केवळ झाडे न लावता ती जगवण्यासाठी लक्ष देण्याची गरज असून येत्या काही वर्षात घनदाट झाडीतून झुळझुळ वाहणारी वालधुनी नदी सर्वांनी केलेल्या कामाची आठवण करून देईल.
- डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top