Ram Navami
Ram NavamiSakal Media

पालघर जिल्ह्यात रामनामाचा जयघोष; मंदिरात भाविकांची रीघ

वसई : दोन वर्षे कोरोनामुळे उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते; मात्र यंदा रामनवमी उत्सव (Ramnavami Festival) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालघर (Palghar) जिल्ह्यातील मंदिरात भाविकांची रीघ (Devotees in temple) पाहावयास मिळाली. जय श्री रामाच्या (jai shri ram) जयघोषाने अवघा पालघर जिल्हा भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.

Ram Navami
उल्हासनगरात वालधुनी नदीवरील जुन्या पुलाला मिळणार नवालुक; दीपक सिरवानी

रामनवमीनिमित्त डहाणू, सफाळे, बोईसर, पालघर, वसई, विरार, विक्रमगड, तलासरी, जव्हार भागातील राम मंदिरात सकाळपासून भाविकांची रेलचेल सुरू होती. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते.

रामनवमीनिमित्त वसईत स्टेशन ते रमेदी राम मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला; तर सोपारा गाव येथील मंदिरात डॉ. किशोरकुमार जोशी यांनी भजन व कीर्तनाचे आयोजन केले होते. काही ठिकाणी रामायणाचे आयोजनदेखील मंदिरात करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com