
आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम
धारावी, ता. १२ (बातमीदार ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘लोकांचे दोस्त कला मंच’ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर संयुक्त जयंती कमिटी (आंबेडकरनगर, एलफिन्स्टन) यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या जयंती महोत्सवात पुस्तक दान आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भरीव आर्थिक योगदान अशा लक्षवेधी उपक्रमांचे आयोजन केले आहे.
१४ एप्रिलला संध्याकाळी आंबेडकर नगरात साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवात आयोजकांच्या वतीने जेजुरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील संत तुकाराम वाचनालयाला मोठ्या प्रमाणावर पुस्तके दान केली जाणार आहेत. तसेच मैत्रकुल या जीवनशाळेतील मुलांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती आयोजक पुष्कराज शिरधनकर यांनी दिली. जयंती उत्सवात खेळ, स्पर्धा याबरोबरच लोकांचे दोस्त कला मंच शाहिरी जलसा सादर करणार आहेत. रवी भिलाणे, राजा आदाटे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष संदीप कदम आणि सचिव प्रथमेश गायकवाड यांनी या वैशिष्ट्यपूर्ण आयोजनात पुढाकार घेतला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..