
क्रिकेट स्पर्धेत जिल्हा पोलिस संघ विजेता
पालघर, ता. १२ (बातमीदार) ः पालघर न्यायालय व वकील संघटनेद्वारे क्रिकेट स्पर्धा पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट असोशियन, बोईसर येथील मैदानावर आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत पालघर जिल्हा पोलिस संघ विजेता तर जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पालघर यांच्या साई ११ हा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेसाठी पालघर जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पालघर डी. एच. केळुसकर, सह दिवाणी न्यायाधीश वि. पी. खंदारे, सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. काळे, सह दिवाणी न्यायाधीश एस. एच. तेलगावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलिस उपअधीक्षक हेगाजे, पोलिस निरीक्षक अजय वसावे, पालघर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश महाडिक, वकील राजेश मोगरे, तेजल ठाकूर, व्ही. सी. संखे, प्रशिला मोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..