घरफोडी करणारे सराईत अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी करणारे सराईत अटकेत
घरफोडी करणारे सराईत अटकेत

घरफोडी करणारे सराईत अटकेत

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने अटक केली असून यात एका अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. गुन्हे शाखेने त्‍यांच्याकडून सुमारे ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २३ मोबाईल असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत झाल्याने आयुक्त बिपिनकुमार सिंह, सहआयुक्त, डॉ. जय जाधव व गुन्हे शाखेचे अपर आयुक्त महेश घुर्ये यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक गंगाधर देवडे यांचे पथक नेमण्यात आले होते. पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रबाळे परिसरात सापळा लावून शफीक अब्दुल शेख (४४) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्‍याने दिघा परिसरात दिवसा घरफोडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार शफीकला अटक करून त्याच्याकडून २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४८ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले.

सीसीटीव्ही फुटेजवरून शोध
गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून घणसोली सेक्टर -१५ येथील गुणाली तलावाजवळ सापळा लावून मयूर दीपक रेंगे (१८) व त्‍याचा अल्पवयीन साथीदार दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी रात्रीच्या वेळेस घणसोली गावदेवीवाडी येथील भाग्यलक्ष्मी मोबाईल शॉपी या दुकानातून २३ मोबाईल चोरल्‍याचे कबूल केले. दोघांकडून एक लाख १० हजारांचे २३ मोबाईल हस्तगत केले. त्यानंतर गुन्हे शाखेने दोघांना रबाळे पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top