crime update Bharari squad take action against liquor smuggling
crime update Bharari squad take action against liquor smugglingsakal

भरारी पथकाने रोखली दारूची तस्करी

कारवाईदरम्यान दमण बनावटीच्या दारूसह चार लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मनोर : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून डहाणू तालुक्यातील सायवन किन्हवली रस्त्यावर सायवन गावच्या हद्दीत मंगळवारी (ता. १२) रात्री ९ वाजता दारू तस्करीवर कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान दमण बनावटीच्या दारूसह चार लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारचालकासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कारचालक सुरेश रामस्वरूप मंडल (५०) आणि सागर पांडुरंग भोईर (४२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

डहाणू तालुक्यातील सायवन-किन्हवली रस्त्यावरून मंगळवारी रात्री दमण बनावटीच्या दारूची तस्करी केली जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार किन्हवली-सायवन रस्त्यावरील सायवन गावच्या हद्दीत सापळा रचण्यात आला होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या मारुती सिलेरियो कारची (एम ०१ सीव्ही ४३७९) तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला तसेच दादरा नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठी असलेला २५.९२ बल्क लिटर विदेशी मद्य साठा आढळून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com