शहरातील शांतता राखण्यासाठी अजान आणि भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची भूमिका
शहरातील शांतता राखण्यासाठी अजान आणि भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची भूमिकाsakal

भोंग्यांबाबत मुस्लिम बुद्धीचीवींचे मवाळ धोरण

शहरातील शांतता राखण्यासाठी अजान आणि भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची भूमिका

मुंबई : राज्यात भोंग्यांवरून वाद निर्माण झाल्याने मुस्लिम समुदायातील विचारवंत, बुद्धिजीवी, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलच्या सदस्यांनी बोरीबंदर येथील अंजुमन इस्लाम शाळेत बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी शहरातील शांतता राखण्यासाठी अजान आणि भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची भूमिका घेतली आहे. या भूमिकेचे मनसेने स्वागत केले आहे.

राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ईद सणापर्यंतची मुदत दिली आहे. यावरून राजकारण तापले असतानाच मुस्लिम समुदायातील विचारवंत, बुद्धिजीवी, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलच्या सदस्यांनी आज याबाबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्या अजान आणि भोंग्यांवरील भाषणानंतर मुंबईत झालेल्या बदलांवर चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलचे कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी मंडळी मुस्लिम नेत्यांची, मशिदींचे ट्रस्टप्रमुख यांची भेटी घेणार आहेत.

शहरातील कायदा, सुव्यवस्था ठेवणे हे सर्वांचे काम आहे. राजकीय फायद्यासाठी एका समाजाला लक्ष्य केले जाऊ नये; मात्र कायदा प्रत्येक समाजासाठी समान असला पाहिजे, अशी भूमिका अखिल भारतीय मिली कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सरचिटणीस एम. ए. खालिद यांनी व्यक्त केली. तसेच राज ठाकरे यांचा मुस्लिम समाजातील लोकांशी चांगला संपर्क होता. एनआरसी आणि सीएए मुद्द्यावरून आम्ही त्यांना दोनदा भेटलो होतो. त्यांनी भडक वक्तव्य करण्यापेक्षा याबाबत बैठक बोलावून चर्चा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया मुस्लिम कौन्सिलने व्यक्त केली.

आवाजाची पातळी कमी करणार
मुस्लिम नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची माहिती देण्यात येणार आहे. त्यानुसार आवाजाची पातळी दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल राखण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मुस्लिम परिषदेचे प्रतिनिधी आणि शिक्षणतज्ज्ञ सलीम अल्वारे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com