Accident News
Accident Newssakal

कशेडी घाटात दुचाकी-ट्रकची जोरदार धडक

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चिपळूण दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार ठोकर

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चिपळूण दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार ठोकर दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धामणदेवीजवळ मंगळवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

कशेडी येथील महामार्ग पोलिस केंद्राच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर धामणदेवी गावच्या तळोजा येथून लोटे येथे जाणाऱ्या ट्रकने पेढांबे, चिपळूण येथून मुंबईकडे जाणाऱ्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार अथर्व सावंत (२५, पेढांबे, ता. चिपळूण) याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलादपूर पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्गाची सहायक फौजदार यशवंत बोडकर यांनी ही पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, नवनाथ घोलप यांनी रुग्णवाहिकेतसह घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com