alphonso mango
alphonso mangosakal

शेतकरी करणार मॉल्समध्ये हापूसची विक्री

‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’तर्फे ‘मँगो फ्ली’ हा उपक्रम

ठाणे : आंबा हे रसाळ फळ आवडत नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. तेव्हा हापूस आंब्याचा ‘लोकल ते ग्लोबल’ ब्रँड विकसित करत शेतकऱ्यांना व्रिकीसाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’तर्फे ‘मँगो फ्ली’ हा उपक्रम ठाणे, मुंबईसारख्या शहरांतील मॉल्समध्ये राबवण्यात येणार आहे. २२ एप्रिल ते १५ मेदरम्यान आयोजित केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून कोकणच्या शेतातील अस्सल हापूस आंबा थेट मॉल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना विक्री करण्याची संधी आंबा बागायतदार शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

ठाण्यातील कोरम मॉलमध्ये हा उपक्रम २२ ते २४ एप्रिलदरम्यान राबवला जाणार असून या ‘मँगो फ्ली’ महोत्सवात रत्नागिरी, पावस, मालवण, राजापूर, विजयदुर्ग, देवगड, कुणकेश्वर आदी भागांतील हापूसचे प्रत्येकी १० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. खुद्द आंबा बागायतदार शेतकरी कोकणातील आंब्यांची विक्री करणार असून या माध्यमातून तब्बल ३५० शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच ग्राहकांनादेखील नैसर्गिकरीत्या पिकवलेले, कोणतीही भेसळ नसलेले आणि जीआय मानांकनप्राप्त हापूसचा आस्वाद घेता येणार आहे. या संपूर्ण उपक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन; तर सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा पाठिंबा असून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा यांचे सहकार्य लाभले आहे.

येथे होणार विक्री
कोरम मॉल- ठाणे- २२ ते २४ एप्रिल- दुपारी १२ ते रात्री १०
आर सिटी मॉल- घाटकोपर- २९, ३० एप्रिल, १ मे- दुपारी ३ ते रात्री १०
फिनिक्स पलेडिअम मॉल- लोअर परळ- ६ ते ८ मे, दुपारी १२ ते रात्री १०
सीवूड्स सेंट्रल- नवी मुंबई- १३ ते १६ मे

आंबा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे, त्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, परिश्रमाचा योग्य आर्थिक मोबदला मिळावा या दृष्टीने आम्ही विविध संकल्पना राबवत असतो. आंब्याची ऑनलाईन विक्री, शेतकरी ते थेट ग्राहक या योजनेनंतर या वर्षी शेतकऱ्यांना शहरातील मॉल्समध्ये आंबाविक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
- संजय यादवराव, संस्थापक, कोकण भूमी प्रतिष्ठान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com