navi-mumbai
navi-mumbaisakal

नवी मुंबईतील ४७५ इमारती धोकादायक

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे २०२१-२२ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे.
Summary

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे २०२१-२२ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे.

वाशी - नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील (New Mumbai Municipal Area) धोकादायक इमारतींचे (Dangerous Building) २०२१-२२ या वर्षासाठी सर्वेक्षण (Survey) करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर पालिका क्षेत्रात एकूण ४७५ इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

याशिवाय ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई पालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून स्‍ट्रक्‍चरल ऑडिट करून घेणे अनिवार्य असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारस केलेली दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महापालिकेकडे सादर करावे लागणार आहे.

इमारतीचे स्‍ट्रक्‍चरल ऑडिट करण्यास जी संस्‍था, मालक तथा भोगवटादार टाळाटाळ करतील, त्यांना २५ हजार रुपये अथवा सदर मिळकतीचे वार्षिक मालमत्ताकराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रकमेचा दंड ठोठावण्याची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलमाखाली अंतर्भूत करण्यात आली आहे.

नवी मुंबई महापालिकेने संरचनात्मक परिक्षक (स्ट्रक्चरल इंजिनिअर) यांची यादी नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. धोकादायक झालेल्या इमारतींचा तथा घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ शकते म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा तथा घराचा रहिवासी वापर तत्काळ थांबविण्यात यावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. एखादा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

३० सप्टेंबर अहवाल सादर करण्याची मुदत

महापालिका क्षेत्रातील तीस वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतींचे संरचनात्मक परिक्षण ३० सप्टेंबर २०२२ पूर्वी पूर्ण करून याबाबतचा अहवाल नवी मुंबई पालिकेचे संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि सहाय्यक संचालक नगररचना यांच्याकडे सादर करावयाचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com