st update thane
st update thanesakal

एसटीच्या उत्पन्नात दुपटीने वाढ

कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन; त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कमर्चारी कर्तव्यावर हजर

ठाणे : एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून मागील सहा ते सात महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्याचा थेट परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर कर्मचारी वर्ग हळूहळू कर्तव्यावर रुजू होऊ लागला आहे. त्यानुसार ठाणे विभागात गेल्या १० ते १२ दिवसांत तब्बल एक हजार ५२४ कर्मचारी हजार झाले. त्यामुळे संप काळात दिवसाला २० ते २५ हजार किलोमीटर धावणारी एसटी बस आता सरासरी ६० ते ७० हजार किलोमीटर धावू लागल्याने उत्पन्नात दुपटीने वाढ झाली असून, सुमारे ४० ते ५० लाखांचे उत्पन्न होत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची दाहकता लक्षात घेऊन राज्य सरकारने वेतनवाढीचा सकारात्मक निर्णय घेत, कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कमर्चारी कर्तव्यावर हजर झाले होते. त्यात कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर जाण्याची सूचना न्यायालयाने केली होती. या सूचनेचे पालन करून बडतर्फ केलेले, सेवासमाप्ती झालेले कर्मचारी एसटी सेवेत रुजू होत आहेत. ठाणे एसटी विभागात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक असे सर्व मिळून एकूण दोन हजार ७५८ कर्मचारी आहेत. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ५२४ कर्मचारी हजर झाले. यामध्ये ३१९ चालक, ३५८ वाहक, चालक कम वाहक ६७८, कार्यालयीन कर्मचारी ६ आणि कार्यशाळेतील ६३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दैनंदिन प्रवास वाढला
ठाणे विभागीय क्षेत्रात एकूण ५१८ बस आहेत. त्यापैकी सध्याच्या घडीला ४४६ बस रस्त्यावर धावत आहेत. संपाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करता दिवसभरात २० ते २५ हजार किलोमीटर बसचा प्रवास होत होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे एसटी बसचा प्रवास वाढून एक लाख ३१ हजाराच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे उत्पन्नातही वाढ झाली असून, आता ४० ते ५० लाखांचे उत्पन्न ठाणे विभागाला मिळत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com