अमर हिंद मंडळाची नाट्यगीत गायन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमर हिंद मंडळाची नाट्यगीत गायन स्पर्धा
अमर हिंद मंडळाची नाट्यगीत गायन स्पर्धा

अमर हिंद मंडळाची नाट्यगीत गायन स्पर्धा

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ ः कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या दादर येथील अमर हिंद मंडळ या संस्थेने नाट्यगीत गायन स्पर्धेची घोषणा केली आहे. कोरोना महामारीच्या साथीमुळे गतवर्षी या स्पर्धेचे स्वरूप बदलले होते. मात्र या वर्षी स्पर्धा प्रत्यक्ष अमर हिंद मंडळाच्या दादर येथील सभागृहात ३ मे रोजी घेतली जाईल.
ही स्पर्धा १५ ते ५५ वयोगटातील सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क १०० रुपये असून नोंदणी करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल आहे. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना सात, पाच आणि तीन हजारांची रोख पारितोषिके, प्रमाणपत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. अधिक माहितीसाठी आपण अमर हिंद मंडळ, दादर, संपर्क क्रमांक (०२२) २४२२३५८९ (सायंकाळी ६ ते ८ पर्यंत), तसेच समीर चव्हाण ९८२१८१२३३८ अथवा रवींद्र ढवळे यांच्याशी ९९२०५७२९७४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top