
संतांच्या चाळीत शंभर वर्षे हरिगजर
प्रभादेवी, ता. २४ (बातमीदार) : पिढ्यानपिढ्या चालत आलेली सांप्रदायाची संस्कृती पुढे सुरू ठेवत गेली शंभर वर्षे अखंड हरिनामाचा गजर करणाऱ्या प्रभादेवीतील संतांची चाळ (सद्गुरू निवास सोसायटी) म्हणून प्रचलित असलेल्या या सोसायटीतील रहिवासी या वर्षी सप्ताहाचा शतक महोत्सव साजरा करत आहे. विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि दिंडीचे आयोजन करण्यात आले असून २७ एप्रिलपर्यंत हा उत्सव रंगणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात रामकृष्ण भावे महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी केली. भावे महाराज मूळचे मिरजचे होते. हरिनामाच्या प्रसारासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली. प्रभादेवी या ठिकाणी संतांची चाळ परिसरात त्यांना नामस्मरणासाठी पोषक वातावरण मिळाले. अंबाजी धामापूरकर महाराजांनी त्यांना विठ्ठल नामासाठी विनवले आणि तिथूनच त्यांनी परमार्थाची घडी बसवत नामस्मरणाला सुरुवात केली, अशी माहिती राम घाडगे महाराज यांनी दिली.
विठ्ठल नामात दंग झालेल्या भावे महाराजांनी इतिहासाचे गाढे अभ्यासक असलेल्या अर्जुन साळुंखे यांच्यावर पुढील जबाबदारी देण्यात आली. त्यांनी ती नारायण घाडगे यांना दिली व नारायण महाराजांनी राम घाडगे यांच्याकडे दिली आहे.
१९२१ पासून हरिनामाचा सप्ताह सुरू झाला. तेव्हापासून प्रतिवर्षी चैत्रामधील वसंत पंचमीपासून सप्ताहास सुरुवात करण्यात येते. या दिवशी १८ व्या अध्यायाचे पारायण केले जाते.
...
विविध कार्यक्रम
तुकाराम महाराजांच्या गाथ्यावरचे भजन, हरिपाठ आदी कार्यक्रमांसोबतच सात दिवस वीणा अखंड हातात घेऊन नामस्मरण केले जाते. आठव्या दिवशी नगर प्रदक्षिणा घातली जाते. या वेळी दिंडीमध्ये महिला मुलांसह सर्वजण भक्तिभावाने सामील होतात. काल्याची दहीहंडी म्हणजे अवर्णनीय सोहळा असतो. यात काल्याचे कीर्तन झाल्यावर महिला पूजा करतात. त्यानंतर दहीहंडी फोडली जाते. नंतर काल्याचा प्रसाद सर्वांना वाटण्यात येतो, असे संदीप नलावडे व सुहास घाग यांनी सांगितले.
...
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..