शिवडीत पुनर्विकासाच्या मागणीसाठी निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडीत पुनर्विकासाच्या मागणीसाठी निदर्शने
शिवडीत पुनर्विकासाच्या मागणीसाठी निदर्शने

शिवडीत पुनर्विकासाच्या मागणीसाठी निदर्शने

sakal_logo
By

वडाळा, ता.२४ (बातमीदार) ः शिवडी-न्हावा या उन्नत मार्गात बाधित होणाऱ्या उपकार प्राप्त इमारतींचाही पुनर्विकास करण्यात यावा, तसेच इतर मागण्यांसाठी प्रकल्पबाधितांनी आज शिवडीत निदर्शने करून प्रभातफेरी काढली. बृहन्मुंबई भाडेकरू परिषद, शिवडी पुनर्विकास समन्वय समिती, परळ पुनर्विकास समन्वय समिती आणि प्रभादेवी पुनर्विकास समन्वय समिती यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान, शिवडी बस डेपो ते जगन्नाथ भातनकर मार्ग, प्रभादेवी दरम्यान ही रॅली काढण्यात आली.
गेल्या एक वर्षापासून न्हावा-शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामामुळे शिवडीतील आचार्य दोंदे मार्ग, शिवडी ते जगन्नाथ भातनकर मार्ग, प्रभादेवी या रस्त्यांवरील दोन्ही बाजूकडील घरांच्या, दुकानांच्या आणि इमारतींच्या सुरक्षिततेबाबत स्थानिकांना प्रश्न उपस्थित केले आहेत. या मार्गाच्या निर्मितीसाठी व इतर परिसराच्या प्रगतीला स्थानिकांचा कोणत्याही प्रकारचा विरोध करण्याचा मानस नाही. मात्र या मार्गाच्या निर्मितीप्रक्रियेत ६० ते ८० वर्षे जुनी घरे, उपकार प्राप्त इमारती आणि दुकानांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जगन्नाथ भातनकर मार्ग, प्रभादेवी येथील काही उपकार प्राप्त इमारतधारकांना सरकारकडे कागदपत्रे तपासणीसाठी जमा करण्यास सांगितले आहे. तसेच त्यांचे पुनर्वसन जगन्नाथ भातनकर मार्गापासून दूर गौमाता नगर येथे करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे; परंतु याला नागरिकांचा विरोध असून, मार्गालगत असणाऱ्या उपकार प्राप्त इमारतींचा पुनर्विकास त्यांच्या मूळ जागी क्लस्टर विकास किंवा टाऊनशिप विकास असा कोणत्याही प्रकारे करावा, पण या मूळ मुंबईकरांना इतर ठिकाणी बळजबरीने विस्थापित करू नये, अशी मागणी आहे.

रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष
सरकारदरबारी मागण्यांबाबत पाठपुरावा केला असता सरकारकडून आणि विभागीय लोकप्रतिनिधींकडून ठोस, लिखित उत्तरे देण्यास निरुत्साह दाखवला जातो. या सर्व प्रकरणात आपल्या रास्त मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे आणि विभागातील इमारतींना गटागटात वेगवेगळे करून पुनर्विकासाच्या बाबतीत नागरिकांना संगठित होण्यापासून मज्जाव करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे रहिवाशांच्या पुनर्विकासाची मागणी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आज ही निदर्शने करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top