सेल्फी पॉईंटचे लोकार्पण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेल्फी पॉईंटचे लोकार्पण!
सेल्फी पॉईंटचे लोकार्पण!

सेल्फी पॉईंटचे लोकार्पण!

sakal_logo
By

बदलापूर, ता. २४ ः बदलापूरपासून सुमारे ५ किमी अंतरावर असणाऱ्या जांभूळ गावात प्रवेश करतानाच गावाच्या वेशीवर उभारण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ आणि ‘आम्ही जांभूळकर’ सेल्फी पॉईंटचे आमदार किसन कथोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांचा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जांभूळ गावाच्या वेशीवर झालेल्या या सोहळ्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी अरुण कटाळे, व्ही. यु. बी. इंजिनियरिंगचे प्रभाकर सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे प्रवेशद्वार आहे. हे नावच फार महत्त्वाचे आहे. नावातच सर्वकाही आले असे आपल्या भाषणाच्या प्रारंभी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. जात, धर्म नको, केवळ गावाचा विकास हेच विचार महत्त्वाचे असून हे विचार सरपंच परीक्षित पिसाळ आणि त्यांच्या पूर्ण टीमने कृतीत आणल्याने गावाची प्रगती झाली आहे. जांभूळ गावाची आता शहरीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचेही आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रगती करण्याचे अलौकिक कार्य या सर्वांनी केले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांनी यावेळी केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top