पालकांच्या व्यसनांचा परिणाम मुलांवर होतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांच्या व्यसनांचा परिणाम मुलांवर होतो
पालकांच्या व्यसनांचा परिणाम मुलांवर होतो

पालकांच्या व्यसनांचा परिणाम मुलांवर होतो

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) ः व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून पालकांच्या व्यसनाचा परिणाम मुलांवर होतो, असे प्रतिपादन उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मेडिकल ऑफिसर डॉ. ममता सुरडकर यांनी केले. मॅनेजमेंट बदलल्यापासून सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने सातत्याने विविध लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाअंतर्गत कंपनीच्या कामगारांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन व्हीआयपी सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. ममता सुरडकर बोलत होत्या.

मद्यप्राशन व धूम्रपान ही व्यसने केल्याने हृदयरोग, कॅन्सर आणि फुप्फुसांचे आजार, स्वरंयत्र, अन्ननलिका व श्वसननलिकेचा कर्करोग, स्वादुपिंड, मूत्राशय, मूत्रपिंड, मूत्रनलिका, प्लिहा, मुख कर्करोग आदी घातक आजार होतात. यापासून लांब राहण्याचे आणि मुलांवरील परिणाम टाळण्याचे आवाहन डॉ. ममता सुरडकर यांनी केले. या व्याख्यानाला मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. व्याख्यान यशस्वी करण्यासाठी सीमा चिंचलकर, उमा शहा कैचे यांनी अथक परिश्रम घेतल्याची माहिती सेंच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top