सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी
सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी

सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.२४ (वार्ताहर): सायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील उड्डाणपुलावरील मुंबई लेनवरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याने रविवारी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन खारघरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पाम बीचमार्गे वळविल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाली. मात्र त्यानंतर देखील दिवसभर या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
सायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील उड्डाणपुलावरील मुंबई लेनवरील रस्त्याच्या दुरुस्तीचे व डांबरीकरणाचे काम महिन्याभरापूर्वीपासून हाती घेण्यात आले आहे. मात्र डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयपीएलचे सामने सुरू झाल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आले होते. आता पुन्हा या मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील एकच मार्गिका वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आल्याने सायन-पनवेल मार्गावर सीबीडी ते खारघरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहने सीबीडी येथून पाम बीचमार्गे वळविण्यात येत आहेत. मात्र त्यामुळे सीबीडी परिसरात वाहनांची गर्दी वाढून या भागात वाहतूक कोंडी होत आहे.

आणखी ५ दिवस
उरण फाटा येथील उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदाराला ५ दिवस देण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढील ५ दिवस मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे, अशी माहिती सीबीडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top