
विरोधी पक्ष नेत्यांकडून मान्सूनपूर्व उपाययोजनांची पाहणी
पनवेल, ता.२४ (नितीन देशमुख) : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन शहरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची व मान्सूनपूर्व उपाययोजनांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज क्रीडा मैदान येथे लेदर क्रिकेट पिच तयार करण्याबाबत सूचना केली.
मांडवकर वाडा येथील फूटपाथ आणि अंतर्गत ड्रेनेज स्वच्छतेची यावेळी पाहणी करण्यात आली. नागरिक उघड्यावर कचरा टाकतात, त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. मोहल्ला येथील गटार आणि नालेसफाई, तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पद्धतीने सफाई करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
पनवेल भाजी मार्केटजवळील जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज स्मारक येथील झालेल्या विकासकामांची पाहणी आणि पावसाळ्यामध्ये तेथील पाणीनिचरा होण्यासाठी व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या प्रकारे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. संत श्री तुकाराम महाराज स्मारकाच्या येथे सुरक्षितता आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीने रेलिंग करणे गरजेचे होते, ते काम त्वरित करण्यास सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..