
गीताध्ययनातून गर्भसंस्कार वर्ग
मानखुर्द, ता. २५ (बातमीदार) ः गीतेच्या अध्ययनातून गर्भसंस्कार या संकल्पनेतून श्रीकृष्ण जोशी यांनी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दररोज नियमितपणे ठरविक वेळी गरोदर महिलांना भगवद्गीतेतील दोन अध्याय म्हणून दाखवतात. विशेष म्हणजे हा उपक्रम अगदीच निःशुल्क आहे. त्याला गरोदर महिलांकडून तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
श्रीकृष्ण जोशी हे मागील पंधरा वर्षे दादर येथे भगवद्गीता संथावर्ग चालवत आहेत. या उपक्रमांतर्गत गरोदर महिलांना ते दररोज ठराविक वेळी फोनवरून संपर्क साधतात व भगवद्गीतेतील दोन अध्याय म्हणून दाखवतात. गीतापठणाच्या या उपक्रमात गौरी आंबेडकर, मीनल येळेकर, तसेच रवींद्र महाजन यांचे गुरुजींना मोलाचे सहकार्य लाभत आहे. अधिकाधिक गरोदर महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, त्यासाठी ९६१९८२८१५७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन गुरुजींनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..