
पर्यावरण जागृतीसाठी गोदरेजची डिजिटल पुस्तिका
मुंबई, ता. २५ ः मुलांमध्ये पर्यावरण जपणुकीची जाणीव निर्माण होण्यासाठी गोदरेज इंडस्ट्रीने वसुंधरा दिनानिमित्त डिजिटल पुस्तिका प्रकाशित केली.
द लास्ट क्लाऊड, रे, ड्रॉप, मॅन्ग्रोव्ह अँड बी असे या पुस्तिकेचे नाव आहे. मुलांसह सर्वांनीच पर्यावरण रक्षणाचा वसा घेऊन, नष्ट होत चाललेली जीवसृष्टी जपण्याचा प्रयत्न करावा, हा त्यामागील हेतू आहे. चांगल्या भविष्यासाठी पर्यावरण वाचवा, असा संदेश यातून द्यायचा आहे.
माही नावाचे पात्र मुलांना गोष्टी रूपातून पर्यावरण रक्षणाचा संदेश यातून देते. पर्यावरण जपण्यासाठी सर्वांच्या सहभागाबरोबरच मुलांचा सहभाग आवश्यक असल्याचे यातून दाखवण्यात आले आहे. पर्यावरणाच्या मुद्यांबाबत मुले संवेदनशील असल्याचे जाणवल्याने त्यांना याबाबत शास्त्रीय माहिती देऊन चांगल्या सवयी लावण्याचाही पुस्तकाचा हेतू आहे. पर्यावरण रक्षणासाठी आणि स्वच्छ व हरित वसुंधरेसाठी गोरदेज इंडस्ट्रीज कटिबद्ध असून तीच देशाप्रती आमची जबाबदारी आहे. ही वैयक्तिक जबाबदारीची जाणीव सर्वांमध्ये रुजावी हाच या पुस्तिकेमागील उद्देश असल्याचे गोदरेजच्या कार्यकारी संचालक श्रीमती तान्या दुभाष म्हणाल्या.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..