अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेस अटक
अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेस अटकsakal

अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेस अटक

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या मुस्कान दीपक कानोजिया या महिलेस बोरिवलीतून अटक

घाटकोपर : अमली पदार्थ विक्री करणाऱ्या मुस्कान दीपक कानोजिया या महिलेस बोरिवलीतून अटक करण्यात आली. तिच्याकडून ३४५ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत जवळपास ५१ लाख ७५ हजार इतकी आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण पथक, निगराणी पथक व एटीसी पथक यांची स्वतंत्र पथके तयार करून कारवाई करण्यात आली.

अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेस अटक
घाटकोपरमधील मंदिराला भेट

पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाच्या गस्तीदरम्यान सेंट फ्रान्सिस शाळेजवळ, दहिसर (नदी किनारा) बोरिवली (प.) येथे उभ्या असणाऱ्या एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिला ताब्यात घेतले. चौकशीत अमली पदार्थांची विक्री करण्याकरिता आल्याचे तिने सांगितले. त्यानुसार तिच्यावर एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com