Tue, October 3, 2023

भूषण पवार यांचा सन्मान
भूषण पवार यांचा सन्मान
Published on : 25 April 2022, 9:20 am
वडाळा, ता. २५ (बातमीदार) ः कोरोना महामारीच्या काळात संकटात सापडलेल्या गरीब, गरजूंना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे कार्य करणाऱ्या भूषण पवार यांचा संबोधी सामाजिक मंडळ शिवडी यांच्या वतीने रविवारी (ता.२४) सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य घडावे यासाठी पवार यांना मंडळातर्फे प्रोत्साहित करण्यात आले. कोकणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व आदिवासी पाड्यांतील नागरिकांना मदत करणाचे कामदेखील त्यांनी केले आहे.