
आरोग्य केंद्रातील सेवकांचा सत्कार
वसई, ता. २५ (बातमीदार) ः जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून शिवछाया मित्र मंडळ नवयुग नगर दिवाणमान व बहुजन विकास आघाडी, नवघर माणिकपूर विभागाच्या संयुक्त विद्यमाने पालिका नागरी आरोग्य केंद्र, दिवाणमान येथील ३६ आरोग्य सेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सेवकांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यात डॉ. आप्पासाहेब सालपुरे, डॉ. शीतल पाटील, डॉ. पूजा गुप्ता, संगीता बेलदार, नीलम ठाकरे, माया जाधव सहभागी झाले होते. या वेळी मंडळाचे संस्थापक व स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव यांनी हिवतापसंबंधी माहिती दिली. ते म्हणाले की, वसई-विरार पालिका डासांवर विविध प्रकारे कीटकनाशक औषधे वापरून त्याचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न करत आहे. हिवतापाच्या लक्षणांवर त्वरित खबरदारी घेतल्यास रुग्ण बरा होतो. आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालून जी नागरिकांना आरोग्य सेवा देतात हे कौतुकास्पद आहे. याप्रसंगी माजी उपमहापौर प्रकाश रॅाड्रीक्स, स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव, वृंदेश पाटील, कल्पेश मानकर, शिवछाया मित्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..