Women and men killed in accident in Bhiwandi
Women and men killed in accident in BhiwandiSakal

भिवंडीत वाहनाच्या धडकेत महिला-पुरुष ठार

भिवंडी तालुक्यातील पारोळ मार्गावर दुचाकीवरून कामानिमित्त निघालेल्या दोघांचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील पारोळ मार्गावर दुचाकीवरून कामानिमित्त निघालेल्या दोघांचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना लाखिवली (जांभूळपाडा) येथे आज पहाटे सहाच्या सुमारास घडली. जयवंती सालकर (४५), शशिकांत शिंदे (३५) अशी दोघांची नावे आहेत. तालुक्यातील भुईशेत गावात राहत असलेले शशिकांत शिंदे हे नोकरीनिमित्त मुंबईच्या दिशेने जात होते.

त्याचवेळी जयवंती सालकर या गजरा विकण्यासाठी भिवंडीला जात होत्या. शिंदे हे भिवंडीलाच जात असल्याने जयवंती या त्यांच्या दुचाकीवर बसल्या. दुचाकी लाखिवली गावाजवळ असलेल्या जांभूळपाडा येथे आली असता, अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी तालुका पोलिस धाव घेत पंचनामा केला. तसेच दोघांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता भिवंडीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com