ठाणे : स्कूल बसच्या इंजिनला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School bus fire
स्कूल बसच्या इंजिनला आग

ठाणे : स्कूल बसच्या इंजिनला आग

ठाणे: तीन हात नाक्यावरील सिग्नलवर उभ्या असलेल्या ऐरोली येथील न्यू होरायझन पब्लिक स्कुलच्या बसला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. आग लागली तेव्हा बसमध्ये पहिली ते तिसरीतील एकूण १६ विद्यार्थी होते. यावेळी वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून मुलांना बस बाहेर उतरवून सुरक्षित अंतरावर नेले आणि तत्काळ आग नियंत्रणात आणली. इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

ऐरोली येथील न्यू होरायझन पब्लिक स्कूलमधील पहिली ते तिसरीत शिकणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना घेऊन घरी सोडण्यासाठी माजिवाडा वरून ठाणे मेंटल हॉस्पिटल, इकडे जात होती. ती बस तीन हात नाका येथील सिग्नल लागल्याने सिग्नलवर उभी असताना अचानक बसच्या इंजिनमध्ये धूर येऊ लागला. ही बाब वाहतूक पोलिसांच्या निर्दशनास आल्यावर त्यांनी तातडीने बस एका बाजूला घेऊन बसमधील विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. तसेच लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तोपर्यंत ठाणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. बसमध्ये १६ विद्यार्थ्यांसह चालक आणि मदतनीस असे एकूण १८ जण होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून ही आग किरकोळ असल्याचे ठाणे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, वाहतुक पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. तसेच बसमधून त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून तत्काळ सुरक्षित ठिकाणी नेले. त्याचबरोबर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले.
- बाळासाहेब पाटील, पोलिस उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top