सुरेश पुजारीच्या पोलिस कोठडीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरेश पुजारीच्या पोलिस कोठडीत वाढ
सुरेश पुजारीच्या पोलिस कोठडीत वाढ

सुरेश पुजारीच्या पोलिस कोठडीत वाढ

sakal_logo
By

ठाणे, ता. २५ : गँगस्टर सुरेश पुजारी याच्या पोलिस कोठडीमध्ये ठाणे मोक्का न्यायालयाने आज चार दिवसांची वाढ केली. त्याला २९ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उल्हासनगरचे केबल व्यावसायिक सच्चानंद ऊर्फ सच्चू कारीरा यांच्यावर ११ सप्टेंबर २०१५ रोजी गोलमैदान येथील त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. त्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही हत्या सुरेश पुजारी याने घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये पुजारी सध्या उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. त्याच्या कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे उल्हासनगर पोलिसांनी त्याला आज ठाणे विशेष मोक्का न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात अद्याप तपास अपूर्ण असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती.