तालुकास्तरीय स्पर्धेत नेणवली शाळेचे विद्यार्थी चमकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुकास्तरीय स्पर्धेत नेणवली शाळेचे विद्यार्थी चमकल
तालुकास्तरीय स्पर्धेत नेणवली शाळेचे विद्यार्थी चमकल

तालुकास्तरीय स्पर्धेत नेणवली शाळेचे विद्यार्थी चमकल

sakal_logo
By

पाली, ता. २८ (वार्ताहर) : सुधागड तालुका गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या संकल्पनेतून सुधागड तालुक्यांत पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित व इंग्रजी विषयांवर आधारित स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये नेणवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले.
विभागस्तरावर नेणवली शाळेतील आठ विद्यार्थी पात्र झाले; तर तालुकास्तरावर चौथीची जान्हवी चव्हाण गणित व इंग्रजी स्पर्धेत प्रथम क्रमांक, पाचवीमध्ये आर्या मगर मराठी प्रथम क्रमांक, इयत्ता सातवीमध्ये आदर्श चव्हाण भाषेमध्ये द्वितीय क्रमांक आणि आदेश जाधव याने इंग्रजी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. शाळेने एकूण पाच बक्षिसे पटकावली. या विद्यार्थ्यांना शाळेचे शाळेचे मुख्याध्यापक संतोष हरपाल, शिक्षक राजन अंबिके व गणपत वरघडे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35352 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top