जागृत कष्टकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागृत कष्टकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा
जागृत कष्टकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा

जागृत कष्टकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा

sakal_logo
By

कर्जत, ता. २७ (बातमीदार) : वन हक्क दावे, पीक पाणी पंचनामे, आदिवासींना अंत्योदय कार्ड, मोफत धान्य, घरांना घरपट्टी आदी मागण्यांसाठी जागृत कष्टकरी संघटनेने बुधवारी कर्जत तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. संघटनेच्या कार्याध्यक्षा नॅन्सी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
पोलिस मैदानासमोरून सुरू झालेला हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून टेकडीवरील तहसील कार्यालयावर पोहोचला. मोर्चात मागण्यांचे फलक झळकत होते. विशेष म्हणजे एवढ्या दुपारच्या रणरणत्या उन्हातील मोर्चात आदिवासी महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चेकऱ्यांना रोखले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेकांनी आपली व्यथा सांगत आक्रोश केला. त्यानंतर तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
----------------------------------------------------------------------------------------------------
या आहेत मागण्या
- नागेवाडीच्या ७० दावेदारांच्या दाव्यांचे निकाल लवकर लावावेत.
- ऑगस्ट २०२१ मध्ये दाखल केलेल्या न नोंदलेल्या कुळांच्या वहीवाटीखालील जमिनीच्या पीक पाहणी अर्जांचे पंचनामे करावेत.
- वन हक्क कायद्यातील तरतुदीनुसार वन जमीन कसणाऱ्यांचे प्रलंबित असलेले दावे मंजूर करा.
- गहाळ झालेल्या दाव्यांची जबाबदारी घेऊन ते तातडीने नव्याने तयार करून मंजूर करा.
- सागाचीवाडी पायलट प्रोजेक्टच्या धर्तीवर सर्व दळी जमिनींचे वहिवाटीनुसार मोजणी करा.
- प्रत्येक रेशन दुकानावर घेतलेल्या रेशनची पावती मिळालीच पाहिजे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35362 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top