कबड्डी स्पर्धेत कर्जतचा मिडलाईन संघ ठरला विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबड्डी स्पर्धेत कर्जतचा मिडलाईन संघ ठरला विजेता
कबड्डी स्पर्धेत कर्जतचा मिडलाईन संघ ठरला विजेता

कबड्डी स्पर्धेत कर्जतचा मिडलाईन संघ ठरला विजेता

sakal_logo
By

कर्जत, ता.२८ (बातमीदार) : तळोजा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजित केलेल्या राज्ययस्तरीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी संघावर चित्तथरारक विजय मिळवीत कर्जतच्या मिडलाईन संघ विजेता ठरला.

मॅटवरील कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात कर्जत मिडलाईन संघाने रत्नागिरी संघावर ३५/३३ अशा गुणांनी रोमहर्षक विजय मिळवून रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्चल केले. शेवटच्या चढाईपर्यंत चाललेल्या या सामन्यात दोन्ही संघांकडे समान ३३/३३ गुण होते आणि शेवटच्या रत्नागिरीच्या चढाईत मिडलाईन संघाचे फक्त तीन खेळाडू मैदानात असताना सुपर टॅकल पक्कड करून दोन गुण मिळवत सामना आपल्या बाजूने झुकवून रोमहर्षक विजय मिळवला. स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा मानकरी मिडलाईनकडून खेळणारा मुद्रे गावातील प्रतीक बैलमारे ठरला; तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी देऊळवाडी गावाचा सनी गायकर याला मिळाले. त्याला मोटरसायकल देऊन गौरविण्यात आले. नांगुर्ले गावचा राजेंद्र देशमुख, हलवली गावचा प्रशांत जाधव, चेडोबा मुद्रे गावचा वैभव मोरे व इतर खेळाडू यांनी मिडलाईन संघ तयार केला आहे. प्रशिक्षक अनिकेत म्हात्रे यांनी कर्जतमधील विविध खेळाडू एकत्र करून हा संघ बांधला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35371 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top