महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना वेग
महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना वेग

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना वेग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : निसर्ग आणि तौत्के अशा दोन चक्रीवादळांचा पूर्वानुभव असलेल्या महावितरण कंपनीने रायगड जिल्ह्यात मान्सूनपूर्वी दुरुस्‍ती दीड महिन्यापूर्वीच सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास ५० टक्के कामे पूर्ण झाली असून महत्त्वाची कामे मे महिन्यात सुरू होणार असल्याने डागडुजीसाठी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत महावितरणच्या पेण विभागाने दिले आहेत.
सध्या तापमानात कमालीची वाढ झाली असून सरासरी ३४ अंशावर चढलेल्या पाऱ्यामुळे घराबाहेर पडणे शक्य होत नाही. त्यातच अधूनमधून पडणाऱ्या पावसाने वातावरणातील आर्द्रतेत आणखी वाढ झाली आहे. पाणीटंचाई, खंडित वीजपुरवठ्यामुळे यंदाचा मे महिना रायगडवासीयांचा चांगलाच घाम काढणारा ठरणार आहे.
यंदा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त आहे. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळात गतवर्षी नादुरुस्त झालेली वीज यंत्रणा घाईघाईत सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये काही उणिवा राहिल्‍याने त्यांची दुरुस्ती मान्सूनपूर्व करण्याचा वीज वितरणचा प्रयत्‍न आहे. देखभाल दुरुस्‍तीसाठी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून सध्या ग्रामीण भागात दिवसाला दोन - तीन तास वीज खंडित होत आहे. यासाठी ठराविक वेळापत्रक नसल्याने वीज केव्हा गायब होईल, याची कोणालाच माहिती नसते.
गेल्या काही दिवसांपासून उकाडा अधिकच वाढला आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना हे जास्त जाणवते. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असून आर्द्रता वाढल्‍याने घामाच्या धारा निघत आहेत. खंडित वीजपुरवठ्यामुळे नळ पाणीपुरवठा योजनादेखील पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईलादेखील सामोरे जावे लागते.

चक्रीवादळाप्रमाणेच मान्सून सुरू होताना झाडांच्या फांद्या तुटणे, लोंबकणाऱ्या तारांमुळे शॉर्टसर्किट होणे असे प्रकार जास्त होतात. याचबरोबर जुने खांब काढून नवे खांब बसवणे, रोहित्रांची दुरुस्ती, मुख्य वाहिनीची दुरुस्ती अशी कामे मे महिन्यात सुरू करावी लागतात. नादुरुस्त वाहिनीवरील वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे. मान्सून येण्यास महिन्याभराचा कालावधी शिल्‍लक असल्‍याने मान्सूनपूर्व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
- आय. ए. मुलाणी,
अधीक्षक अभियंता, महावितरण, पेण विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35428 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top