धूप रोखण्यासाठी वृक्षलागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धूप रोखण्यासाठी वृक्षलागवड
धूप रोखण्यासाठी वृक्षलागवड

धूप रोखण्यासाठी वृक्षलागवड

sakal_logo
By

प्रमोद जाधव

अलिबाग ः
वाढते औद्योगिकरण, नागरीकरण, तसेच विकास प्रकल्‍पांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत आहे. वनसंपदा नष्ट होत असल्याने झाडांमुळे मिळणाऱ्या ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. वातावरणात बदल होऊन तीव्र उष्णता जाणवू लागली आहे. जमिनीची धूप होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यावर उपाय म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रसाद गायकवाड यांनी पर्यावरणपूरक व जमिनीची धूप रोखणाऱ्या कांचन व शिवन या दोन झाडांची लागवड करण्याचा संकल्‍प केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविला जाणार असून यासाठी सुमारे दोन हजार रोपे तयार करण्यात आली आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जमिनीची धूप रोखण्याबरोबरच पर्यावरणपूरक व कमी कालावधीत वाढणाऱ्या झाडांची लागवड करण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रसाद गायकवाड यांनी केला. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत कांचन व शिवन ही रोपे तयार करण्यात आली. पिशव्यांमध्ये बियाणे पेरण्यापासून रोपे तयार होण्यासाठी साडेचार महिन्यांचा कालावधी लागला असून नर्सरीमध्ये आतापर्यंत दोन हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर त्‍यांची लागवड केली जाणार आहे. या झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार असून ऑक्सिजनचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. झाडांवर वेगवेगळ्या प्रजातीच्या पक्ष्यांचाही किलबिलाट वाढेल. भविष्यात कडुनिंब, वड, पिंपळ यांसारख्या झाडांची लागवड करण्याचाही संकल्प असल्‍याचे गायकवाड यांनी सांगितले.

--

कांचन व शिवन ही रोपे कमी कालावधीत तयार होणारी आहेत. सहा महिन्यांत झाडांमध्ये रूपांतर होते. या झाडाला पसारा असल्याने यावर वेगवेगळ्या पक्ष्यांचा वावर वाढणार आहे. या झाडांमुळे जमिनीची धूप रोखता येणार आहे. त्यामुळे दरड कोसळण्याची घटना रोखण्यात मदत होणार आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर या झाडांची लागवड करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत दोन हजार रोपे तयार केली आहेत. जुलै महिन्यात या रोपांची लागवड करण्याचा प्रयत्न आहे.
- प्रसाद गायकवाड, वन परिक्षेत्र अधिकारी,
सामाजिक वनीकरण विभाग.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35436 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top