तालुकास्तरीय स्पर्धेत पाच्छापूर शाळेचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुकास्तरीय स्पर्धेत पाच्छापूर शाळेचे यश
तालुकास्तरीय स्पर्धेत पाच्छापूर शाळेचे यश

तालुकास्तरीय स्पर्धेत पाच्छापूर शाळेचे यश

sakal_logo
By

पाली, ता. ३ (वार्ताहर) : सुधागड तालुका गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या संकल्पनेतून केंद्र, बीट व तालुका स्तरावर नुकतीच सांस्कृतिक स्पर्धा आणि मराठी, गणित व इंग्रजी गुणवत्ता विषयांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पाच्छापूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरघोस बक्षिसे पटकावली आहेत.
नाट्यीकरण स्पर्धेत पाच्छापूर शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सोनाली सरकार (सहावी) मराठी आणि सारिका निरगुडे गणित गुणवत्ता विषयात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. नाट्यीकरण सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचे तहसीलदार दिलीप रायण्णावार व गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश वारंगे, केंद्रप्रमुख कल्पना पाटील, सर्व सदस्य, पालकांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अनिल राणे, शिक्षक जनार्दन भिलारे, धनाजी कोपनर, रमेश पवार व कमलाकर तांडेल यांनी मार्गदर्शन केले.

पाली : बक्षीस स्वीकारताना पाच्छापूर शाळेचे विद्यार्थी व शिक्षक.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35458 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top