
खरेदीला उधाण
खरेदीला उधाण
सोने खरेदीसाठी गर्दी; दुचाकी खरेदीला किंचित अल्प प्रतिसाद
अलिबाग, ता. ३ (बातमीदार) ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त यंदा खरेदीला उधाण आल्याचे चित्र बाजारपेठेत होते. इलेक्ट्रिक वस्तू, सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये गर्दी होती. लग्नसराईचा हंगाम, जवळपास दोन वर्षांनी उठलेले निर्बंध आणि सोन्याचे भाव स्थिर असल्याने सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ज्वेलर्स दुकानदारांकडून सांगण्यात आले. मंगळवारी रायगड जिल्ह्यातील दुचाकीच्या शोरूममध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३५ ते ४० टक्के दुचाकी खरेदी कमी झाल्याचे शोरूम चालकांकडून सांगण्यात आले. इलेक्ट्रिक वाहनांना पसंती आणि इंधन दरवाढीमुळे पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींना तुलनेने कमी मागणी होती.
अक्षय्य तृतीयाला खरेदीला अधिक महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदीसह जागा, फ्लॅट तसेच वेगवेगळ्या वस्तू खरेदीला पसंती दिली जाते. अलिबागसह अन्य ठिकाणी दुचाकी खरेदीला सकाळी सुरुवात झाली. त्यामुळे दुचाकी विक्रेत्यांमध्ये समाधान निर्माण झाले होते. शोरूमध्ये दुचाकी खरेदीवर वेगवेगळ्या सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
तब्बल १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये किमतीची १२५ वाहने खरेदी झाली असून त्यापासून एक कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची उलाढाला झाली आहे. तसेच अलिबाग तालुक्यात अलिबाग, पोयनाड, रेवदंडा या मुख्य बाजारपेठा असून या ठिकाणी असलेल्या सोने, चांदी खरेदीच्या दुकानांत ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यात सुमारे ८० लाख रुपयांची उलाढाली झाल्याचे उमेश मोरे या सराफा दुकानदाराने सांगितले.
अक्षय्य तृतीयेनिमित्त दुचाकी खरेदीला गर्दी होईल, या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात दुचाकी उपलब्ध केल्या होत्या. परंतु ग्राहकांचा अल्प प्रमाणात दिसून आला. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सुमारे ४० टक्के खरेदीवर परिणाम झाला आहे. ग्राहकांकडून मागणी कमी असल्याचे दिसून आले आहे.
- नवीन झा,
दुचाकी विक्रेता, अलिबाग
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35460 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..