अलिबागमधील महिलांसाठी रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबागमधील महिलांसाठी रोजगार
अलिबागमधील महिलांसाठी रोजगार

अलिबागमधील महिलांसाठी रोजगार

sakal_logo
By

अलिबाग, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील थळ येथील खतनिर्मिती करणारी आरसीएफ कंपनी, वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटी व सीएफटीआय या संस्थेच्या पुढाकाराने अलिबागमधील महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. ''मी होणार स्वावलंबी'' हा उद्देश समोर ठेवून खास महिला व तरुणींसाठी शिवणकला प्रशिक्षण सुरू केले आहे. या प्रशिक्षणात सहभाग घेणाऱ्या महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना रोजगाराचे साधन खुले करून दिले जाणार आहे.
वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात या प्रशिक्षणाचा शुभारंभ मंगळवारी (ता. ३) झाला. प्रशिक्षणात सहभाग घेणाऱ्या महिलांना प्रवेशपत्र वाटप करण्यात आले. या वेळी थळ येथील आरसीएफ कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अनिल खाडेकर, प्रमोद देखमुख, जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, वेश्वीचे माजी उपसरपंच प्रफुल्ल पाटील, चेंढरेचे सरपंच स्वाती पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिर्जे, ओमकार पोटे, नंदकुमार कदम, गणेश गावडे, अमोल देशपांडे, अमोल नाईक आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिलांसाठी खास शिवणकला प्रशिक्षण शिबिर सुरू केले आहे. १० जूनपर्यंत दोन महिने हे प्रशिक्षण असणार आहे. दर आठवड्यातील पाच दिवस हे प्रशिक्षण दोन तास घेतले जाणार आहे. जयश्री साळवी प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांना या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. स्वावलंबी बनून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यास त्या सक्षम व्हाव्यात, हा उद्देश समोर ठेवून प्रशिक्षण सुरू केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून सुरुवातीला ५० महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
------------------------

आरसीएफच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे. आर्थिक, शैक्षणिक विकास साधण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवणकला प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. यातून महिलांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आरसीएफ कंपनीसह पीएनपी एज्युकेशन सोसायटी, सीएफटीआय या संस्थामार्फत केला आहे.
- अनिल खाडेकर, वरिष्ठ व्यवस्थापक, आरसीएफ कंपनी, थळ

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35462 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top