सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला आग
सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला आग

सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला आग

sakal_logo
By

पाली, ता. ३ (बातमीदार) ः पालीतील कुंभार आळीजवळील वस्तीत असलेल्या मेणबत्ती व सुगंधी तेल निर्मिती करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी (ता.३) दुपारी भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केले. दुपारी साडेतीनच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले; पण या आगीत कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला. ही आग कशामुळे लागली, ते समजू शकले नाही. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास निम्म्याहून अधिक आग नागरिकांनी विझवली. नंतर सुप्रीम पेट्रोकेमिकल्स, रिलायन्स कंपनी रोहा एमआयडीसीमधून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पूर्ण आग विझवण्यात आली. या वेळी पाली पोलिसदेखील घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेनंतर नागरिकांनी कारखाना मालकावर संताप व्यक्त केला. भरवस्तीतील हा कारखाना इतरत्र हलवण्यात यावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी वारंवार केली आहे; पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करीत केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनास्थळी तहसीलदार दिलीप रायण्णावार, पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, जिल्हा परिषद सदस्य सदस्य सुरेश खैरे व रवींद्र देशमुख, नगराध्यक्षा गीता पालरेचा, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, नगरसेवक गणेश सावंत व सुलतान बेनसेकर आणि भाजपा दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा उपस्थित होते.
---------
कोट
स्थानिक तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. फायर ब्रिगेड येण्यापूर्वी बरीच आग नियंत्रणात आली होती. सध्या तापमान खूप आहे. येथील आग लागलेले ड्रम काढू नयेत. धग कमी झाल्यावर पुढील कार्यवाही करू. कुणीही आगीच्या घटनास्थळी जाऊ नये. इतर दुर्घटना घडू नये, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी.
- विश्वजीत काईंगडे, पोलिस निरीक्षक, पाली

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35469 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top