समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद
समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

अलिबाग, ता. ४ (बातमीदार) : डिफेन्स अकॅडमी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. अलिबागमधील जयमाला गार्डन येथे तीनदिवसीय शिबिराचा शुभारंभ शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या शिबिराला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वसंरक्षण व आत्मनिर्भरता शिबिरात मुलांच्या शारीरिक व मानसिक विकास योगा मेडिटेशन श्रमसंस्कार आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये सैन्यभरती संदर्भात माजी सैनिक बॉम्ब डिफ्युस आणि डिस्पोजल प्रशिक्षक व राष्ट्रपती पदक विजेते बसवराज गोवे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता पिळणकर आणि जिल्हा कुस्ती शिक्षक संदीप वांजळे, डिफेन्स अकॅडमी संस्थापक सचिव समरेश शेळके यांनी मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये एकूण १६२ विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35473 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top