
अलिबाग तहसीलदारांकडून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे
अलिबाग, ता. ४ (बातमीदार) : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अलिबागमधील विश्व अॅकेडमीमार्फत प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. या वेळी अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे दिले. या वेळी तपस्वी गोंधळी, सुचिता साळवी उपस्थित होते.
वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन दिले जात आहे. तरीदेखील या स्पर्धा परीक्षांबाबत रायगड जिल्ह्यातील बरेच विद्यार्थी अलिप्त व वंचित आहेत. दहावी, बारावी, पदवी परीक्षेनंतर बहुतांश विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे, कशात करियर करायचे या समस्येला सामोरे जावे लागते. या वयातील आणि अशा स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंसिद्धा संचलित स्पर्धा विश्व अकॅडमीने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम राबवत आहे. त्यांना विविध स्पर्धा परीक्षा संदर्भात माहिती देऊन मदत करत आहेत. नुकतेच अलिबागमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संस्थेमार्फत घेण्यात आले. या वेळी तहसीलदार मीनल दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35475 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..