
कर्जत गुंडगे रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात
कर्जत, ता. ४ (बातमीदार) : कर्जत नगरपालिका क्षेत्रातील गुंडगे प्रभागातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. नगरसेवक उमेश गायकवाड यांनी याची दखल घेत नगरपालिकेकडे पाठपुरावा केला. अखेर पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
गुंडगे प्रभागात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात निवासी संकुले उभी राहिली. या संकुलांमध्ये नागरिक राहण्यासही आलेत; मात्र त्यांच्यासाठी रस्ता बनवण्यात आला नाही. नगरपालिकेचे सर्व कर भरतो, तरी आम्हाला रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली होती. अखेर नागरिकांनी स्थानिक नगरसेवक उमेश गायकवाड यांच्याकडे धाव घेत रस्त्याची मागणी केली. तसेच रस्त्याचे काम करून देणार नसेल, तर रस्त्यावर उतरून निषेध नोंदवू, असा संताप व्यक्त केला. अखेर नागरिकांची मागणी लक्षात घेत नगरपालिकेकडे पाठपुरावा करत नगरसेवक उमेश गायकवाड यांनी काम पूर्ण केले.
-----
अनेक दिवसांपासून गुंडगे प्रभागातील रस्त्याबाबत नागरिकांची मागणी होती. ती मागणी लक्षात घेऊन नगरपालिकेकडे पाठपुरावा करून रस्त्याचे काम हाती घेतले आहे.
- उमेश गायकवाड, नगरसेवक
Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35479 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..