पालीतील जळालेला कारखाना बंद करण्याची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीतील जळालेला कारखाना बंद करण्याची नोटीस
पालीतील जळालेला कारखाना बंद करण्याची नोटीस

पालीतील जळालेला कारखाना बंद करण्याची नोटीस

sakal_logo
By

पालीतील जळालेला कारखाना बंद करण्याची नोटीस
अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ४ (वार्ताहर) : पालीतील कुंभारआळीजवळील भरवस्तीत असलेल्या मेणबत्ती व सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली होती. या घटनेची दखल घेत बुधवारी पाली नगरपंचायतीने ‘इंडियन व्हेस्क फेम पार्टनर’ या कारखान्याच्या मालकांना नागरी वस्तीतील कारखाना (आस्थापना) बंद करण्यासंबंधी पत्र दिले आहे.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम नियम २००६ च्या अनुषंगाने चालवत असलेली आस्थापना आवश्यक त्या उपाययोजना करण्यास अपयशी ठरल्याचे निदर्शनास आलेले आहे. ज्याअर्थी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन संरक्षण उपाययोजना अधिनियम २००६ (२००७ चा महा ३) यांच्या तरतुदीखाली या कारखान्यात बसवण्यात आलेली आग प्रतिबंधात्मक साधने सुस्थितीत व कार्यान्‍वयित स्थितीत ठेवण्यात आलेली नाहीत. तसेच त्यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना आढळून आलेल्या नाहीत. या कारखान्याच्या चारही बाजूंना अत्यंत घनदाट वस्ती असल्याने कारखान्याच्या प्रदूषणाचा खूप मोठा त्रास येथे राहणाऱ्या जनतेला सातत्याने होत आहे. या कारखान्यामुळे सार्वजनिक जीवितास बाधा पोहोचत आहे. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून हा कारखाना बंद ठेवण्यात यावा, असे पत्रात नमूद केले आहे.

पाली : कारखान्याला लागलेली भीषण आग. (छायाचित्र ः अमित गवळे)

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35486 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top