कोर्लईतील ''त्या'' बंगले खरेदी प्रकरणी सोमय्या जनहित याचिका दाखल करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोर्लईतील ''त्या'' बंगले खरेदी प्रकरणी सोमय्या जनहित याचिका दाखल करणार
कोर्लईतील ''त्या'' बंगले खरेदी प्रकरणी सोमय्या जनहित याचिका दाखल करणार

कोर्लईतील ''त्या'' बंगले खरेदी प्रकरणी सोमय्या जनहित याचिका दाखल करणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे कोर्लई येथील १९ बंगले खरेदीचे प्रकरण उकरून काढत भाजपचे खा. किरीट सोमय्या यांनी आंदोलन छेडले होते. रायगड पोलिस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे पाहून किरीट सोमय्या यांनी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे ठरवले आहे. यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात येणार असून यासाठी अलिबागमधील १२ वकिलांची फौज सज्ज करण्यात आली आहे. या वकिलांबरोबर बुधवारी सकाळी सविस्तर चर्चा केली.
पुढील १० दिवसांत याचिकेचे काम पूर्ण होऊन मे महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. आज किरीट सोमय्या अलिबागमध्ये वकिलांशी चर्चा करण्यासाठी आले होते. मारुती नाका येथील शार्दुल सोसायटीमधील अॅड. अंकित बंगेरा यांच्या घरी ही चर्चा झाली. मुंबईतील वकिलांनी यासंदर्भातील ड्राफ्ट तयार केलेला आहे, परंतु येथील वस्तुस्थिती अलिबागमधील वकिलांना जास्त माहिती असल्याने त्यात काही त्रुटी राहू नये यासाठी अधिक माहिती किरीट सोमय्यांनी करून घेतली. उद्धव ठाकरेंच्या कोर्लई अलिबाग येथील १९ बंगल्यांच्या घोटाळ्यासंदर्भात किरीट सोमय्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांकडून कोणताही पाठपुरावा होत नसल्याने आता न्यायालयीन लढा दिला जाणार असल्याची माहिती अॅड. अंकित बंगेरा यांनी दिली. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे पोलिसांना देण्यात आलेली आहेत.
२०२१ पर्यंत करभरणा
रश्मी उद्धव ठाकरेंनी अन्वय नाईकांकडून कोर्लई येथे ९.५ एकर जमीन १९ बंगल्यांसह विकत घेतली. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांनी या ५.४२ कोटी रुपये किंमत असलेल्या १९ बंगल्यांसाठी १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत कर भरला होता, पण इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये हे बंगले दाखवले गेले नाहीत. आता ठाकरे म्हणत आहेत, की बंगले गायब झालेत. यात घोटाळा झाला असल्याचे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. आज झालेल्या चर्चेत अ‍ॅड. किरण कोसमकर, अ‍ॅड. अंकित बंगेरा, सुहास करूळकर, अॅड. अमित देशमुख, श्रीविष्णू धरण, मिलिंद साळवकर, अ‍ॅड. हीना तांडेल, निखिल चव्हाण, अ‍ॅड. श्रीराम ठोसर, अ‍ॅड. किशोरी आग्रे, अ‍ॅड. वैशाली शेवटे, अ‍ॅड. अभिषेक सावंत हे या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35488 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top