जिल्ह्यात उद्या राष्ट्रीय लोकअदालती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात उद्या राष्ट्रीय लोकअदालती
जिल्ह्यात उद्या राष्ट्रीय लोकअदालती

जिल्ह्यात उद्या राष्ट्रीय लोकअदालती

sakal_logo
By

अलिबाग, ता. ५ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी (ता.७) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्‍याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश तथा सचिव संदीप स्वामी यांनी दिली. लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात कायद्यांतर्गत प्रकरणे, दिवाणी अपील, तडजोडपात्र पालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादग्रस्‍त प्रकरणे, भारत संचार निगम लिमिटेड, वीज वितरण, राष्ट्रीयीकृत बँका आणि पतसंस्था, इतर थकबाकी बाबतची वादपूर्व प्रकरणांची सुनावणी होणार आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली निघाल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. न्यायालयात भरलेले शुल्क परत मिळते. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35490 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top