ग्रामपंचायतीत लवकरच पोटनिवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतीत लवकरच पोटनिवडणूक
ग्रामपंचायतीत लवकरच पोटनिवडणूक

ग्रामपंचायतीत लवकरच पोटनिवडणूक

sakal_logo
By

अलिबाग, ता. ५ (बातमीदार) : निधन, राजीनामा अथवा अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीमधील सदस्यपद रिक्त राहिलेल्या जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ११८ ग्रामपंचायतीमधील १७२ रिक्त जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे. ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते कामाला लागले आहे. ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील पाच, पेण तालुक्यातील सहा, कर्जत तालुक्यातील पाच, खालापूर तालुक्यातील दोन, रोहा तालुक्यातील चार, उरण तालुक्यातील एक, पनवेल तालुक्यातील एक, सुधागड तालुक्यातील तीन, माणगाव तालुक्यातील १३, तळा तालुक्यातील सात, महाड तालुक्यातील ३८, पोलादपूर तालुक्यातील १४, श्रीवर्धन तालुक्यातील दहा, म्हसळा तालुक्यातील नऊ अशा एकूण ११८ ग्रामपंचायतीमधील १७२ सदस्य पदांची जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यातील सदस्य पदांच्या रिक्त जागांचे कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहेत. त्यासाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू केले आहे. तालुका स्तरावर यंत्रणेने कामाला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी १३ ते २५ मेपर्यंत प्रशासकीय कामकाज चालणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेल्या पदांच्या पोट निवडणुकीसाठी १३ ते २० मे या कालावधीत सकाळी ११ ते दुपारपर्यंत नामनिर्देशन अर्ज भरले जातील. २३ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जाची छाननी होणार आहे. २५ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेणे, त्यानंतर दुपारी ३ नंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ५ जून रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ६ जून रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, मतमोजणी व निकाल घोषित करण्याचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

------------------
उमेदवारांवर नजर राहणार
जिल्ह्यातील १७२ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्यातील मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पथक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार तालुका स्तरावर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा लोकप्रतिनिधी व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.
--------------
अशा आहेत रिक्त जागा
मुरूड ५
पेण ६
कर्जत ५
खालापूर २
रोहा ४
उरण १
पनवेल १
सुधागड ३
माणगाव १३
तळा ७
महाड ३८
पोलादपूर १४
श्रीवर्धन १०
म्हसळा ९
एकूण १७२

Web Title: Todays Latest Marathi News Ali22b35498 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top